Pune Crime News | ठेकेदाराचे अपहरण करुन पळवून नेणार्‍या चौघांना पाठलाग करुन केले जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ऊसतोड मजुर पुरविण्यासाठी पैसे घेतल्यानंतरही मजूर न पुरविणार्‍या ठेकेदाराचे चौघांनी घरातून अपहरण (Kidnapping) करुन त्याला घेऊन जात होते. विमानतळ पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना भिगवण पोलिसांच्या (Bhigwan Police) मदतीने तातडीने वाटेत पकडले. (Pune Crime News)

 

संदीप गुलाब चव्हाण (वय २८), आकाश रमेश राठोड (वय ३५), निलकंठ बाबु आडे (वय ३१), दिगंबर रमेश राठोड (वय २८, सर्व रा. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी बाळु घनशाम पवार Balu Ghansham Pawar (वय २५, रा. सोपाननगर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे रिक्षाचालक आहेत. त्यांनी संदीप चव्हाण याच्याकडून ऊसतोड मजूर पुरवितो, असे सांगून ७ महिन्यांपूर्वी साडेचार लाख रुपये उचल म्हणून घेतले होते. परंतु, त्यांनी मजूर पुरविले नाहीत, शिवाय पैसेही परत दिले नाहीत. पवार हे १८ जानेवारीला रात्री आठ वाजता घरात जेवण करीत असताना अचानक संदीप चव्हाण व त्याचे साथीदार घरात शिरले.

 

त्यांनी पवार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या आई व पत्नीला घरात ढकलून दिले व त्यांना स्वीफ्ट कारमध्ये बसवून घेऊन गेले. त्यांच्या घरच्यांनी ही बाब विमानतळ पोलिसांना कळविली. अपहरण झाल्याचे समजताच पोलिसांनी तांत्रिक तपास करुन आरोपींचा शोध सुरु केला. तेव्हा ते पवार यांना घेऊन सोलापूर रोडने जात असल्याचे व ते यवतच्या पुढे गेल्याचे लक्षात आले. त्याबरोबर विमानतळ पोलिसांनी भिगवण पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी सोलापूर रोडला नाकाबंदी केली. त्यांची गाडी तेथे येताच चौघांना ताब्यात घेऊन ठेकेदाराची सुटका केली. पाठोपाठ विमानतळ पोलीस भिगवणला पोहचले व त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. (Pune Crime News)

विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior PI Vilas Sonde),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप (Inspector of Police (Crime) Mangesh Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रिंवद्रकुमार ढावरे (Sub-Inspector of Police Rinvdra Kumar Dhaware),
शांतमल कोळ्ळुरे, पोलीस नाईक अंकुश जोगदंडे, गिरीष नाणेकर,
सुरेश यपाळे, रुपेश तोडेकर, योगेश थोपटे, दादा बर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा