Pune Crime News | खुन व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खून व मोक्का सारख्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. आरोपी शेवाळे टोळीतील असून तो दीड वर्षापासून फरार होता. ही कारवाई (Pune Crime News) हांडेवाडी चौकात करण्यात आली. आकाश शांताराम काळे (वय-24 रा. माऊली बिल्डींग, फुरसुंगी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2021 मध्ये खुनाची घटना घडली होती. तेव्हापासून आरोपी आकाश काळे हा दीड वर्षापासून फरार होता.

 

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे यांना माहिती मिळाळी की, कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणि मोक्का कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आलेला फरार आरोपी हांडेवाडी चौकात येणार आहे. तेथून तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हांडेवाडी चौकात सापळा रचून आरोपीला अटक केली. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonawane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil), निलेश देसाई,
सतिस चव्हाण, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, बनसुडे, सागर भोसले, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | The fugitive accused in murder and mokka crime was arrested by Kondhwa police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ayan Mukerji | ‘ब्रह्मास्त्र 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ; दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी हिंट

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”