Pune Crime News | पॉक्सो व बलात्कार गुन्ह्यातील फरार आरोपीला दोन वर्षानंतर चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ओडीसात झाला होता फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पॉक्सो (POSCO) आणि बलात्कार (Rape) गुन्ह्यातील आरोपीला चंदननगर पोलिसांनी (Pune Police) दोन वर्षांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा केल्यानंतर आरोपी ओडीसा येथे झाला होता. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) पुणे स्टेशन परिसरात सापळा रचून केली. सोन्या उर्फ स्वप्निल नागनाथ कांबळे (वय-23 रा. शिवतेज नगर, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

आरोपी कांबळे याच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात 2021 मध्ये पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News) गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी ओडिसा (Odisha) येथे पळून गेला. दरम्यान, आरोपी ओडीसा राज्यातील सव्हाईल प्रा. लि. कंपनी काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तो रेल्वेने पुण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे स्टेशन (Pune Station) परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे (API Bhagwan Kamble) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी राजेंद्र लांडगे (Rajendra Landge), पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar),
सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे (API Nilesh Ghorpade), पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे,
श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, गणेश हांडगर, शिवाजी धांडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | The fugitive accused of POCSO and rape was arrested by Chandan Nagar police after two years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होळी (व्हिडिओ)

PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Kolhapur Crime News | अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना