Pune Crime News | मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने टोळक्याने दांडक्याने केली मारहाण

पुणे : Pune Crime News | फुड पार्सल (Food Parcel) देण्यासाठी मुलींच्या वसतीगृहातील (Girls Hostel) रुमवर जाण्यास मनाई केल्याने साथीदारांना बोलावून डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) करुन जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी गणेश बाळासाहेब साबळे (वय २७, रा. सुनितानगर, वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन बाळु व त्यांच्या इतर ६ जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील स्मार्ट लिव्ह इन पीजीमध्ये १५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्मार्ट लिव्ह इन पीजी या मुलींच्या वसतीगृहाचे मॅनेजर आहेत.
एक डिलिव्हरी बॉय फुड पार्सलची डिलिव्हरी करण्यासाठी तेथे आला होता.
तो जबरदस्तीने मुलींचे पीजीवर जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने तेथील सिक्युरिटी गार्ड दीपक मंडल याने त्याला अडवले. त्यावेळी फिर्यादी तेथे आले.
आरोपीने सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
तेव्हा फिर्यादीने रोहन बाळु यास कानाखाली देऊन तेथून जाण्यास सांगितले.
त्याचा राग मनात धरुन तो तेथून निधून गेला. थोड्या वेळाने इतर साथीदारांना घेऊन आला. पीजीचे पार्किंगमध्ये त्यांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने, हाताने मारहाण केली. रोहन बाळु याने दगड फेकून मारल्याने तो डोक्यात लागून ते जबर जखमी झाले. सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | The gang beat them up with sticks for not allowing them to enter the girls’ hostel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

Aurangabad Crime News | नववधूने लग्नाच्या 6 दिवसांनंतर सासरच्या माणसाच्या हातावर तुरी देत केले पलायन; औरंगाबादमधील घटना

Samantha Ruth Prabhu | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला समांथा रुथ प्रभूचा नकार; समोर आले खरे कारण