Pune Crime News | मैत्रिणीने दोघांबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा केला प्रयत्न; विनयभंगाचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | घरी बोलावून दोघांना तु आवडतेस त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवण्यास भाग पाडण्याचा मैत्रिणीने प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका ३८ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७०/२३) दिली आहे. त्यानुसार फिर्यादीची मैत्रिण, तृणाल (रा. खेड शिवापूर) आणि त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील बालाजीनगर (Balajinagar, Dhankawadi) येथील सिद्धार्थ कॉम्प्लेक्समध्ये ९ मार्च रोजी रात्री दहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने त्यांना बालाजीनगर येथील घरी बोलावले.
तेथे तिने दोघांची ओळख करुन दिली.
फिर्यादी या गप्पा मारत असताना सुवर्णा या मैत्रिणीने तु त्या दोघांना खूप आवडते, तु त्यांच्यासोबत झोप.
मी त्यांना ४ ते ५ हजार रुपये देण्यास सांगते, असे म्हणाली. त्याला फिर्यादीने नकार दिला.
तेव्हा आरोपीने फिर्यादीबरोबर भांडणे करुन फिर्यादीवर पैसे चोरल्याचा आळ घेतला.
फिर्यादी या रुमच्या बाहेर येत असताना सुवर्णा व तृणाल यांनी फिर्यादी यांना पकडून ठेवले.
तृणाल व त्याच्या मित्राने फिर्यादीबरोबर अश्लिल वर्तन केले. फिर्यादी यांनी आरडा ओरडा केल्याने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. पोलीस हवालदार जोशी तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | The girlfriend tried to force the two to have physical relations; A case of molestation has been registered against three

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल कामासाठी खास बैठक घ्यावी; आमदार शिरोळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

Akola ACB Trap | फेरफारनोंद करुन 7/12 उतारा वेगळा करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी कप्शनच्या जाळ्यात