Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलला २८ लाखांना गंडा घालणार्‍या मॅनेजरला अटक

पुणे : Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलमधील (Phoenix Mall, Vimannagar) विक्री केलेल्या वस्तूंची रक्कम कंपनीकडे जमा न करता मॅनेजरने तब्बल २८ लाख १४ हजार रुपयांचा कंपनीला गंडा (Fraud Case) घातला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मॅनेजरला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

फ्रान्सिस जोसफ डेव्हिड (वय ३५, रा. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, दापोडी) असे या मॅनेजरचे नाव आहे.

याप्रकरणी प्रथमेश पैठणकर (वय ३३, रा. एरोली, नवी मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९/२३) दिली आहे. हा प्रकार फिनिक्स मॉलमध्ये ऑक्टोबर ते १५ डिसेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फॉसिल इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर आहेत. फॉसिल कंपनीचे स्टोअर मॅनेजर फ्रान्सिस डेव्हीड याने स्टोअरमधील कामगार तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना विश्वासात घेऊन खोटी माहिती दिली. ८ लाख ७३ हजार ४९ रुपये किंमतीच्या कंपनीचे शोरुममधील वॉचेस, ज्वेलरी, बेल्ट, पाऊच, स्ट्रॅप अशा एकूण १४७ वस्तू स्वत:च्या फायद्याकरीता वापरल्या. तसेच ग्राहकांना विक्री केलेल्या वॉचेसची कॅश काऊंटरवर जमा झालेली १९ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम स्वत: घेतली. ती रक्कम कंपनीत जमा न करता स्वत: वापरुन कंपनीची २८ लाख १४ हजार ४६० रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली. पोलिसांनी मॅनेजरला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कोळ्ळुरे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | The manager who defrauded Phoenix Mall at Vimannagar of 28 lakhs was arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Health | हिवाळ्यात अस्थमाच्या रूग्णांनी चुकूनही करू नयेत ही 4 कामे, वाईट होऊ शकतात याची लक्षणे

Low Weight | वजन कमी झाल्याने सुद्धा वाढू शकतात आनेक समस्या, ऑस्टियोपोरोसिस, अ‍ॅनीमियासह होऊ शकतात हे 5 रोग

Pune PMC News | कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी दहा दिवस बंद राहणार