Pune Crime News | आईनेच चिमुरडीचा गळा दाबून केला खून; खडकीतील ३ वर्षाच्या मुलीच्या खूनाचा गुन्हा उघडकीस

पुणे : Pune Crime News | अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या चिमुकलीचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला (Pune Police Crime Branch) खडकीतील ३ वर्षाच्या मुलीच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. संतोष देवमन जामनिक (वय २५) आणि लक्ष्मी संतोष गवई (वय २६, दोघे रा. खेरपुडी, ता. बाळापूर, जि. आकोला) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. (Pune Crime News)

खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रोडच्या दरम्यान सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाच्या चिमुकलीचा २ मार्च रोजी दुपारी मृतदेह आढळून आला होता. गळा दाबून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. खडकी पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा याचा संमातर तपास करीत होते.

मुलीच्या खूनाने एकच खळबळ उडाली होती. ३ वर्षाच्या या मुलीची ओळखही पटत नव्हती. परिसरात कोठेही सीसीटीव्ही नव्हते. घटनेपासून काही अंतरावर पुणे-मुंबई महामार्गावरील एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये एक जोडपे पोलिसांना दिसून आले. त्यातील महिलेच्या कडेवर मुलगी होती. या सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत़ पोलीस खडकी स्टेशनपर्यंत पोहचले. खडकी रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना हेच जोडपे आढळून आले. त्यात बाईच्या कडेवरील मुलीचे पाय सरळ होते. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. (Pune Crime News)

टी शर्ट ठरला महत्वाचा दुवा

या जोडप्यापैकी पुरुषाच्या अंगावर एक टी शर्ट होता. त्यावर संघर्ष ग्रुप, खेरपुडी असे लिहिले होते. त्यावरुन शोध घेताना ते गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती काढली. त्याचवेळी हे दोघे गावात नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दोघेही पुण्यात असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचा शोध सुरु केला. तांत्रिक विश्लेषणातून त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

संतोष आणि लक्ष्मी हे दोघे एकाच गावातील राहणारे असून त्यांच्यात अनैतिक संबंध आहेत.
त्या दोघांनी गावातून पुण्याला पळून  येण्याचे ठरविले. त्यानुसार ते १ मार्च रोजी गावातून निघाले.
त्यावेळी लक्ष्मी हिने आपल्याबरोबर लहान मुलीला घेतले. त्यावरुन रेल्वे प्रवासात त्यांच्यात भांडणे झाली.
भांडणाच्या दरम्यान त्याने मुलीला पट्याने मारहाण केली. तिचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यु झाला. त्यानंतर दोघेही खडकी रेल्वे स्टेशनला आले. तेथून त्यांनी मोकळ्या मैदानात मुलीचा मृतदेह टाकून ते पळून गेले होते. त्यांनी सांगितलेली माहिती आणि सीसीटीव्हीमधील वेळा जुळत असल्याने पोलिसांनी दोघांना खडकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Sr PI Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार,
हरीश मोरे, अजय गायकवाड, संजय आढारी, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, सारस साळवी, नागेशसिंग कुवर,
विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, अशोक शेलार, मनोज सांगळे, शितल शिंदे, वैशाली माकडी यांच्या पथकाने
ही कामगिरी केली.

Web Title :- Pune Crime News | The mother killed the little girl by strangulation; Murder case of 3-year-old girl in Khadki revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra BJP | ‘उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या, शिमग्याच्या बोंबा पुरे आता…’, उद्धव ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर…’, मोदींच नाव घेत भाजप- शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी दिलं खुलं आव्हान

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा…’, भास्कर जाधवांचा इशारा