Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंधाचे फोटो नातेवाईकांमध्ये केले व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवण्यास नकार दिल्यास लग्न न करण्याची धमकी देऊन एकाने तरुणीबरोबर बळजबरी केली. त्यानंतर या संबंधांचे फोटो व व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करुन लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी विमाननगर येथे राहणार्‍या एका २५ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सिद्दालिंगाप्पा मल्लाप्पा मादर (वय २९,रा. शुभम सोसायटी, सोपाननगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक आहे. आरोपीने फिर्यादीसोबत लग्न जमवले होते. तिच्याकडे वेळोवेळी शारीरीक संबधांची मागणी केली. त्याला तिने नकार दिला. त्यावेळी त्याने लग्न न करण्याची धमकी दिली. ते कर्नाटकातील घरात असताना त्याने फिर्यादीबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर पुण्यात आल्यावर येरवड्यातील हॉटेलमध्ये नेऊन फिर्यादीबरोबर संबंध ठेवले. यावेळचे फिर्यादी यांचे फोटो व व्हिडिओ मोबाईलवर बनविले. त्यानंतर त्याने लग्नास नकार देऊन फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ फिर्यादीचे नातेवाईकांमध्ये व्हायरल करुन बदनामी केली. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | The photos of physical relations were made viral
among the relatives by showing the lure of marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा