Pune Crime News | अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ‘मी दिलेल्या दस्तांचे सात बारा नोंदी तुम्ही का करीत नाही? असे म्हणत प्लॉटिंगच्या सात बारा नोंदीच्या कारणावरून महिला तलाठीशी वाद घालून त्यांच्याशी जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या (Pune Crime News) शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाचा (Shikrapur Former Deputy Sarpanch) अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्ज विशेष न्यायाधीश जी. ए. रामटेके (Judge GA Ramteke) यांनी फेटाळला. अशी माहिती अ‍ॅड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी दिली.

 

रमेश राघोबा थोरात (Ramesh Raghoba Thorat) असे अटकपूर्व जामीन फेटाळ्यात आलेल्या माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय महिला तलाठी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) थोरात यांच्याविरूद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी रमेश थोरात याच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या (Atrocity Act) कलम 3 (1) (आर), (एस), 3 (2) (व्हीए) आणि 7 (1) (डी) कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. महिला तलाठी मार्फत अ‍ॅड. राकेश सोनार यांनी कोर्टात बाजू मांडली. ही घटना 22 मे रोजी सकाळी 11 वाजता शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या इमारतीमधील सरकारी कार्यालयात घडली. (Pune Crime News)

कार्यालयात येऊन थोरात यांनी माझा वैयक्तिक प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. त्यातील विक्रीस गेलेल्या प्लॉटिंगबाबत मी तुमच्याकडे सात बारा नोंदीसाठी दस्त दिलेले असताना बरेच दिवस झाले तरी तुम्ही सातबारा नोंदी का करीत नाही? असा जाब विचारत आरोपी थोरात याने वाद घालण्यास सुरुवात केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. वादादरम्यान जातीवाचक विधान केल्यामुळे तलाठ्यांनी थोरात यांच्याविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. आरोपीने शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) विशेष अ‍ॅट्रॉसिटी कोर्टात (Special Atrocity Court) अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.

बचाव पक्षाने युक्तिवाद केला की आम्ही लोकप्रतिनिधी आहे म्हणून आम्हाला गुंतवले आहे आम्ही कोणतेही जातिवाचक अणि शिवीगाळ करून कागदपत्रे फेकून अंगावर फेकून मारली नाही. त्याला विरोध करत फिर्यादीच्या वकिलांनी जोरदार बाजू मांडली. आरोपी हे लोकप्रतिनिधी आहेत व ते जाणून बुजून बेकायदेशीर काम करण्यासाठी सदर तलाठी महिला कर्मचारी यांना जातीवाचक शिवीगाळ करीत असे, आरोपी उपसरपंच थोरात हे गुंड प्रवृत्तीचे असून व त्याचे सहकारी कार्यकर्ते हे फिर्यादींना धमकी देत असतील तर आरोपीला जामीन दिला
तर उद्या फिर्यादी यांचे जगणे मुश्किल करतील वकिलांनी न्यायालयाला पटवून दिल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

 

फिर्यादी यांच्या वतीने अ‍ॅड. महेश देशमुख (Adv. Mahesh Deshmukh), अ‍ॅड निलेश वाघमोडे (Adv. Nilesh Waghmode),
अ‍ॅड राकेश सोनार यांनी बाजू मांडली. अ‍ॅड. राकेश सोनार यांनी आरोपी पासून फिर्यादी यांच्या जीवाला धोका असल्याचे कोर्टला सांगितले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal) यांनी फिर्यादी महिलेस पोलीस संरक्षण देण्याचे
आदेश तापसी अधिकारी यांना दिले असल्याचे अ‍ॅड. सोनार यांनी सांगितले.

 

 

Web Title :  Pune Crime News | The pre-arrest bail of former deputy sarpanch of
Shikrapur was rejected in the crime of atrocity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा