Pune Crime News | धक्का लागल्याने केला रिक्षाचालकाचा खून; सातारा रोडवरील घटनेत दोन दुचाकीस्वारांना अटक

पुणे : Pune Crime News | रस्त्याने जाताना दुचाकीला रिक्षा घासल्याने झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात होऊन त्यात छातीत लाथ घातल्याने रिक्षाचालकाचा मृत्यु (Death) झाला. दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) खूनाचा गुन्हा दाखल करुन दोघा दुचाकीस्वारांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

अरबाज मेहबुब शेख (वय २५, रा. भवानी पेठ) आणि मुखिम गफूर शेख (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे मृत्यु पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपाजवळ (Bhapkar Petrol Pump, Satara Road Pune) सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडला. याबाबत मधुकर राजू दांडेकर (वय ४०, रा. पर्वती दर्शन) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा भाऊ किरण दांडेकर तसेच मित्र बंटी कसबे, निलबा
आणि राजू हे रिक्षात गॅस भरण्यासाठी जात होते. यावेळी भापकर पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला रिक्षा घासली. त्यावरुन आरोपी आणि किरण यांच्यात वाद झाला. त्याचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी आरोपीपैकी एकाने किरणच्या छातीवर जोरात लाथ मारली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यु झाल्याचे घोषित केले. तोपर्यंत आरोपी हे पळून गेले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,
विजय खोमणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यांना आरोपींच्या दुचाकीच्या चार अंकी नंबरावरुन पोलिसांनी काही तासाच्या आत त्यांचा माग काढून दोघांना
अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस. टी. जगदाळे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | The rickshaw puller was killed due to shock; Two bike riders arrested in Satara Road incident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर