Pune Crime News | वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले 1 कोटी 20 लाखांचे कर्ज

मुलाबरोबरच अ‍ॅक्सिस बँक, डीएसए एजन्सीच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | वडिलांच्या मालकीच्या फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने आईच्या खोट्या सह्या केल्या. त्याआधारे अ‍ॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) अधिकार्‍यांशी संगनमत करुन तब्बल १ कोटी २० लाख रुपयाचे कर्ज घेतले. वडिलांनी आपल्याच मुलावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

मुकेश जयंतीलाल शहा (वय ६३, रा. सुयोग, दत्तवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६६०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपन मुकेश शहा Tapan Mukesh Shah (वय ३४), तत्कालीन अ‍ॅक्सिस बँकेचे अधिकारी व डी एस ए एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान अ‍ॅक्सिस बँकेच्या एस बी रोड शाखेत घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा भुसार दुकान आहे.
त्यांचा मुलगा तपन हा त्यांच्याबरोबर काम करीत होता. त्याने घराची कागदपत्रे चोरली.
कोणतीही परवानगी न घेता ती अ‍ॅक्सिस बँकेत कर्जासाठी दिली. फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या खोट्या सह्या केल्या. अ‍ॅक्सिस बँकचे अधिकारी व डीएसए एजन्सीचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज घेतल्यानंतर तपन शहा हा पळून गेला आहे. मुलगा पळून गेल्यानंतर फिर्यादी यांना या कर्जाबाबत समजले. त्यानंतर त्यांनी आता आपल्या मुलाविरोधात फसवणूकीची (Cheating Case) तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे (Assistant Police Inspector Kendre) तपास करीत आहेत.

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

19 September Rashifal : वृषभ आणि मिथुन राशीवाल्यांसाठी दिवस धावपळीचा, वाचा दैनिक भविष्य

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण, लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Pune Crime News | विश्रांतवाडी: टिंगरेनगरमध्ये वडिलाचा मुलाने केला खून