Pune Crime News | ट्रक्सीचालकाचे पैसे न देता सुरक्षा दलातील महिला अधिकार्‍याच्या अंगठ्याचा घेतला चावा; लोहगाव विमानतळावर गोंधळ घालणाऱ्या प्रवासी तरुणीला अटक

पुणे : Pune Crime News | ट्रॅक्सी चालकाचे पैसे न देता विमानतळावर गोंधळ घालणार्‍या व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (Central Industrial Security Force) महिला अधिकार्‍याला धक्काबुक्की करुन हाताला चावा घेणार्‍या प्रवासी तरुणीला पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली. (Pune Crime News)

गुंजन राजेशकुमार अग्रवाल Gunjan Rajeshkumar Agarwal Howrah- Bengal (वय २४, रा. हावडा, प. बंगाल) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे.

याबाबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील Central Industrial Security Force (CISF) निरीक्षक रुपाली ठोके Inspector Rupali Thoke (वय ३९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगाव विमानतळावरील (Lohegaon Airport) प्रस्थान गेट क्रमांक १ वर मध्यरात्री १२ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजन अग्रवाल ही टॅक्सीने विमानतळावर उतरली,
मात्र तिने टॅक्सीचे पैसे दिले नाही. भाड्यावरुन टॅक्सी चालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यामुळे टॅक्सी चालकाने एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीकडे मदत मागितली.
टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला या अग्रवाल यांना विचारणा करण्यास गेल्या.
गुंजन हिने त्यांना शिवीगाळ करुन प्रस्थान गेट नं. १ समोरील रांगेतील प्रवाशांना उपद्रव केला.
भक्ती लुल्ला या तिला समजावित होत्या. त्यांनाही उलट बोलून त्यांच्याबरोबर झटापट केली.
तेव्हा फिर्यादी या तेथे होत्या. त्या लुल्ला यांना सोडविण्यास गेल्या असताना त्यांच्या शासकीय गणवेशाची
कॉलर पकडून त्यांना चापट मारली. त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला.
पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करुन गुंजन अग्रवाल हिला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | The taxi driver bit the thumb of a woman security force officer without paying; Young passenger arrested for creating ruckus at Lohgaon airport

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Pune Crime News | रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन त्याने हिसकावला सोन्याचा हार; रंगावरुनच पोलिसांनी केले चोरट्याला जेरबंद

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू