पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | संस्थेमध्ये नेमलेल्या केअर टेकरने मनोरुग्णाची काळजी घेणे अपेक्षित असते. परंतु, तेथील एका नराधम केअर टेकरने या महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment)केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका ३८ वर्षाच्या पिडितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका ३४ वर्षाच्या केअर टेकरला अटक केली आहे. ही घटना ३ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान संस्थेमध्ये घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या संस्थेत केअर टेकर म्हणून नोकरीला आहे. संस्थेतील महिलांना सहाय्य करणे, त्यांना मदत करण्याचे काम त्याच्याकडे होते. असे असताना त्याने या ३८ वर्षाची महिला रहात असलेल्या रुममध्ये जाऊन कोणी नसताना रुमच्या दरवाजाची कडी लावून पीडिता ही मनोरुग्ण आहे, हे माहित असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार ३ ते १० जानेवारी दरम्यान सुरु होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम (PSI Priyanka Nikam) तपास करीत आहेत.