Pune Crime News | नवी घर घेण्यासाठी धाडसी चोरी, गाडीवरील स्टिकरमुळे चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात; 37 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नवीन घर घेण्यासाठी धाडसी चोरी (Theft In Pune) केली. मात्र गाडीवर लावलेल्या विशिष्ट स्टीकरवरुन सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट (Pune Police Crime Branch) पाचच्या पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) कात्रज परिसरात सापळा रचून केली. आरोपीकडून 37 लाख 30 हजार 200 रुपयांचे 65.5 तोळे सोने जप्त केले आहे.

 

कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) दाखल असलेल्या घरफोडीच्या (Burglary In Pune) गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेकडून कोंढवा परिसरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले. तसेच घटनास्थळाच्या दिशेने येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्ती व त्यांची वाहने तपासण्यात आली. (Pune Crime News) वाहनाचा तपास करत असताना एक जण ज्युपिटर गाडीवरुन संशयित जाताना दिसला. पोलिसांनी गाडी ज्या दिशेने गेली आणि आली तो मार्ग तपासला. त्यावेळी गाडीवर असलेल्या विशिष्ट स्टीकरवरुन पोलिसांनी गाडीची माहिती प्राप्त केली. त्यावेळी ही गाडी सराईत गुन्हेगार मल्लप्पा साहेबान्ना होसमानी Mallappa Sahebanna Hosmani (वय-31 रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) हा वापरत असल्याची माहिती मिळाली.

 

पोलिसांनी कात्रज परिसरात आरोपीचा शोध घेऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी करुन आलेल्या पैशात घर घेऊन दुसरीकडे राहण्याचा प्लॅन होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर लोणीकाळभोर, चंदननगर, हिंजवडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे व हिऱ्याचे दागिने अस एकूण 37 लाख 30 हजार 200 रुपयांचे 655 ग्रॅम दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar),
पोलीस उप निरिक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), चैताली गपाट (PSI Chaitali Gapat),
पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, दिपक लांडगे,
प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, किशोर पोटे,
शशिकांत नाळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, अकबर शेख, अमित कांबळे, स्वाती गावडे,
तृप्ती झगडे, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title :- Pune Crime News | theft to buy a new house, thief in crime branch’s net due to sticker on car; 37 lakhs was confiscated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना