Pune Crime News | बालेवाडी येथील गणेश मंदिरातून चोरट्यांनी चक्क दानपेटीच लांबवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मध्यवस्तीमधील मंदिरातून दान पेट्या पळवण्याच्या घटना थांबल्या असतानाच बालेवाडी येथील गणेश मंदिरातून चोरट्यांनी दानपेटीच चोरून नेली आहे. Pune Crime News | Thieves taken away a donation box from the Ganesh temple at Balewadi

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी वैभव टकले (वय 30, रा. बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे श्री. अष्टविनायक मित्र मंडळ या गणपती मंदिराचे कार्याध्यक्ष आहेत. बालेवाडी येथील ओर्वी सोसायटीत हे गणेश मंदिर आहे. दोन दिवसांपूर्वी (7 जुलै) मंदिराचा दरवाजा उघडा होता.

यादरम्यान अज्ञात चोरट्यांने आत शिरून येथील दानपेटी आणि त्यातील 20 हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार रात्री उशिरा लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळणी करून या चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शिकरे हे करत आहेत.

Web Title : Pune Crime News | Thieves taken away a donation box from the Ganesh temple at Balewadi

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा