Pune Crime News | ‘अबला’ नारीची Facebookवर अशीही करूण कहाणी ! हुंड्यासाठी पतीकडून भोगल्या तब्बल 32 वर्षे ‘नरक’यातना; पुण्याच्या हडपसर पोलिस ठाण्यात FIR (व्हिडीओ)

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News |लग्नात माहेरच्यांनी हुंडा दिला नाही म्हणून बिहारमधील एका सुसंस्कृत शिक्षिका पत्नीवर तिचा पती आणि ५ दिरांसह सासरच्या मंडळींनी गेली ३२ वर्षे अत्यंत अमानवीय पद्धतीने अनन्वित अत्याचार केल्याची दुःखदायक कहानी फेसबूकच्या माध्यमातून जगापुढे आली आहे (Pune Crime News).

Sachin Waze । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीपाठोपाठ आता सीबीआय पुन्हा ‘अ‍ॅक्टिव’ होणार

Pune Crime News | This is the story of that woman on Facebook! 32 years of hell torture suffered by husband for dowry; FIR at Hadapsar Police Station, Pune

पीडित महिलेने आपल्यावरील अन्यायाचा व्हिडिओ फेसबूकवर टाकल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पाटणा शहरातील गंगाब्रिज पोलीस ठाण्यात (Police Station) फेसबूक कंपनीसह पुण्यातील (Pune) स्वतःच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर पीडित महिला जीव वाचवून पुण्यात मुलाकडे रहायला आल्यानंतरही पतीने येथे येऊन तिला जबर मारहाण (Crime ) केल्यामुळे पतीविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Statiion) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Pune Municipal Corporation । 3 लाखांत महापालिकेत नोकरी? पुण्यालगतच्या ‘या’ 23 गावातील बोगस भरतीचा कारभार उघडकीस

कांचनमाला राकेशकुमार वर्मा (Kanchanmala Rakesh Kumar Verma) असे या पीडित महिलेचे नाव आहे. सासरच्या लोकांनी लग्न झाल्याच्या काही महिन्यांतच कांचनमाला (Kanchanmala) यांचा हुंड्यासाठी अनन्वित छळ सुरू केला. बिहारच्या हसनपुरा (Hasanpura of Bihar) येथे पती, सासू, सासरे आणि ५ दिरांची कौटुंबिक जबाबदारी नीट सांभाळत असताना पती अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण उकरून कांचनमाला यांना बेदम मारहाण करायचा. पतीपाठोपाठ पाचही दीर माहेरच्या माणसांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ (Mental and physical abuse) करीत होते.

This is the story of that woman on Facebook! 32 years of hell torture suffered by husband for dowry; FIR at Hadapsar Police Station, Pune 

गेल्या ३० वर्षांत नोकरीमुळे पती राकेशकुमारची (Rakeshkumar) कोलकाता (Kolkata), गया (Gaya), रायपूर (Raipur)आणि हाजीपूर (hajipur) अशा विभिन्न शहरांमध्ये बदली झाली. मात्र, राकेशकुमारने (Rakeshkumar) पत्नीला मारहाण करणे सोडले नाही. कांचनमाला (Kanchanmala) प्रत्येक शहरांत खासगी शाळेत नोकरी करून दोन मुलांचा सांभाळ करीत होत्या. मात्र, पती राकेशकुमार चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना कायम मारहाण करीत होता. कांचनमाला यांचे पाचही दीर, त्यांच्या पत्नी, नणंद हे सर्व कौटुंबिक कलह करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करून प्रसंगी मारहाणही करीत होते.

Shalinitai Patil । पवारांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप; शालिनीताई म्हणाल्या – ‘देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच’

अगदी मरणयातना भोगून कांचनमाला इतकी वर्षे निमूटपणे अन्याय सहन करीत होत्या. दोन्ही मुले शिक्षण घेऊन मोठी झाली, परंतु पतीचे अत्याचार थांबले नाहीत. वडील आणि काकांच्या भडकविण्यामुळे लहान मुलगा देखील कांचनमाला यांचा छळ करीत होता.

Anti Corruption Bureau। अभियंताच्या घरी सापडलं 30 किलो सोन्यासह मोठं घबाड; ACB चं पथक ‘मोजून-मोजून’ थकलं

या कौटुंबिक हिंसाचारातून आईची मुक्तता करण्यासाठी कांचनमाला यांच्या थोरल्या मुलाने त्यांना पुण्यातील आपल्या घरी आणले. आईवरील अन्याय, अत्याचाराची कहाणी फेसबुकवर टाकली. त्यामुळे संतप्त झालेल्या राकेशकुमारने मुलगा प्रतीक वर्मा यांच्यासह बिहारची एक कंपनी आणि फेसबूकविरुद्ध पाटणाच्या गंगाब्रिज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुण्यात मुलाकडे गेल्यानंतरही राकेशकुमारने तिथे येऊन पत्नीला अर्वाच्य शिविगाळ करून मारहाण केली. त्यामुळे हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Actress Mandira Bedi | मृत्यूच्या आधी काय घडलं मंदिरा बेदी- राज कौशल यांच्या घरात? संगीतकार सुलेमान मर्चंट यांनी केलं भाष्य

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime News | This is the story of that woman on Facebook! 32 years of hell torture suffered by husband for dowry; FIR at Hadapsar Police Station, Pune 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update