Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून विवाहितेला पळवून नेण्याची धमकी, वानवडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) विवाहित महिलेच्या वडिलांना त्रास दिला. तसेच महिलेच्या पतीसमोर पळवून नेण्याची धमकी देऊन विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार पुण्यातील वानवडी (Vanavadi) परिसरात घडला आहे. याप्रकरणी एकावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.1) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 39 वर्षीय महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धमेंद्र ठाकूर उर्फ छोटू (वय-43 रा. दरभंगा, बिहार) याच्यावर आयपीसी 354, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी हा फिर्यादी महिलेवर एकतर्फी प्रेम करतो. (Pune Crime News)

आरोपी पीडित महिलेच्या वडिलांना त्रास देऊन महिलेच्या घरासमोर येऊन धमकी देऊन शिवीगाळ करत होता. छोटू याने फिर्यादी यांच्या पतीजवळ मी केस मागे घेण्यासाठी नाहीतर तुझ्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे, असे म्हणून महिलेचा पाठलाग करुन विनयभंग केला. आरोपी सतत पाठलाग करत असल्याने मानहानी होत असल्याची भावना मनात निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना