Pune Crime News | महिला सरपंचाला ‘खैरलांजी’ करण्याची धमकी; तिघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | कुंजीरवाडी येथील महिला सरपंचांना सरपंच पदाचा राजीनामा दे, नाही तर कुटुंबासहित एका रात्रीत तुझा खैरलांजी हत्याकांडासारखी हत्या (Murder) करीन, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी महिला सरपंचांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संग्राम मच्छींद्र कोतवाल (वय २६), राणी मच्छिंद्र कोतवाल (वय ४८), पुष्कर मच्छिंद्र कोतवाल (वय २२, सर्व रा. कुंजीरवाडी ता. हवेली) यांच्यावर अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कुंजीरवाडीतील ग्रामपंचायतीचे मिटींग हॉलमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कुंजीरवाडी गावच्या सरपंच आहेत.
शनिवारी दुपारी कुंजीरवाडी ग्रामपंचायतीची मासिक सभा असल्याने फिर्यादी तसेच उपसरपंच अजय कुंजीर
व ग्रामसेवक बी आर कांबळे हे मिटींग हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी संग्राम कोतवाल तेथे आला.
त्याने फिर्यादीस मी ५० लाख रुपये खर्च करुनही आरक्षण असल्यामुळे तुला सरपंचपदावर बसवले.
नाही तर तु कचर्‍यात पडली असती तुला कुठे जायचे तिकडे जा माझे कुणी वाकड करत नाही.
सरपंच पदाचा राजीनामा दे नाही तर कुटुंबासहित एका रात्रीत तुझा खैरलांजी हत्याकांडासारखी हत्या करीऩ तपास लागू देणार नाही, अशी धमकी देऊन जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करुन लज्जास्पद वर्तन केले. तसेच इतरांनी ग्राम पंचायतीचे बाहेर फिर्यादीचे अंगावर मारण्यासाठी धावून आले व फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Threat of ‘Khairlanji’ to female sarpanch; A case under Atrocity has been registered against the three