Pune Crime News | घरात शिरुन तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी; बोपोडीतील घटना

पुणे : Pune Crime News | त्रास देत असल्याने फोन ब्लॉक केल्यानंतर तरुणाने तिच्या घरात शिरुन तुझ्यावर माझे प्रेम आहे. तु माझ्याबरोबर आली नाही तर तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकीन (Threat Of Acid Attack) आणि माझ्या जीवाचे काही बरेवाईट करील, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी खडकी पोलिसांनी यश रोहित पटेकर Yash Rohit Patekar (वय २२, रा. बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोपोडीमधील एका २२ वर्षाच्या तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि यश पटेकर हे दोघे एकाच कॉलेजमध्ये बारावीला शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांच्यात प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले आहेत. परंतु, तो फिर्यादी यांना सारखे फोन करुन त्रास देत असल्याचे व तिच्यावर अधिकार दाखवत असल्याने तिला त्याचे वागणे आवडत नव्हते. त्यामुळे तिने त्याला मोबाईल ब्लॉकलिस्टमध्ये टाकला. तेव्हा तो तिला मेसेज करुन तू मला फोन कर नाही तर मी तुझे घरी येऊन तुझे माझे काढलेले फोटो व्हायरल करीन अशी धमकी देत असल्याने फिर्यादी त्याचेशी फोनवर बोलत असत.

त्याने फिर्यादी यांच्या आईचा नंबर मिळवून तिच्या मोबाईलवर ५ जानेवारी रोजी फोन केला.
तो तिच्या बहिणीने उचलला. मला फिर्यादीशी बोलायचे असे सांगितल्यावर तिने तो फोन कट केला.
त्यानंतर काही वेळाने तो फिर्यादी यांच्या घरात घुसला. त्याने फिर्यादी यांना तू माझे सोबत चल असे म्हणू लागला.
तेव्हा तिच्या आई व बहिणीने त्याला मज्जाव केला. त्याने पुन्हा माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझेसोबत चल,
असे म्हणून जबरदस्ती करु लागला. तिने नकार देताच तुझे व माझे फोटो व्हायरल करुन तुझ्या कुटुंबाची
बदनामी करेन, असे बोलून आईला बाजूला ढकलून शिवीगाळ केली. तू माझे सोबत चल नाही तर तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी त्यास नकार दिताच त्याने तू आली नाहीस तर मी माझे जीवाचे काही बरेवाईट करीत, त्यास तू व तुझे घरचे जबाबदार असाल, अशी धमकी देऊन तो निघून गेला. त्यामुळे घाबरुन या तरुणीने फिर्याद दिली आहे.

Web Title :- Pune Crime News | Threatened to enter the house and throw acid on the girl; Incident in Bopodi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स