Pune Crime News | मित्राच्या मदतीने शारीरीक संबंधाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे : Pune Crime News | घरच्या हालाकीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तरुणीशी जवळीक साधून तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्तापित केले. कोल्ड्रिंग्समधून गुंगीचे औषध देऊन मित्राला शारीरीक संबंध (Physical Relationship) करायला सांगून त्याचे व्हिडिओ काढले. त्या व्हिडिओवरुन ब्लॅकमेल करुन ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५२/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सागर दिलीप काकडे (वय ३८, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. त्याचा मित्र मयुर साळवे (रा. लोणावळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव पठार, सोमाटणे फाटा, वाकड येथे ११ फेब्रुवारी २०२१ ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर काकडे याने फिर्यादी यांच्याबरोबर ओळख करुन घेतली.
फिर्यादी यांच्या घरच्या हालाकीच्या परिस्थितीची माहिती घेऊन त्यांच्याशी जवळीक साधली.
फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर एकदा फिर्यादी यांचा मित्र मयुर साळवे याच्याशी मोबाईलवरुन बोलत असल्याचे भासवून त्याला व फिर्यादी यांना सागर याने लॉजवर नेले.
तेथे सागर याने फिर्यादी यांना कोल्ड्रिंग्समधून काहीतरी दिले. त्यामुळे फिर्यादी यांना गुंगी आली.
त्यानंतर त्यांचा मित्र मयुर याला फिर्यादीसोबत शारीरीक संबंध करावयास लावला.
सागर याने जबरदस्तीने शारीरीक संबंध करीत असतानाचा व्हिडिओ तयार केला.
या व्हिडिओ वरुन ब्लॅकमेल करुन त्यांना दारू पाजून त्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Threatens to take a video of a physical relationship with the help of a friend

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे चुकले! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले- ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत तर…’

Yavatmal Crime News | पाणी काढायला सांगून पत्नीला विहिरीत ढकलून केला खून

Beed Crime News | दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार