Pune Crime News | झोमॅटो अन् स्वीगीची डिलिव्हरी करताना तिघांनी सुरू केला लुटमारीचा धंदा, पोलिसांनी 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून काढला माग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात झोमॅटो Zomato व स्वीगीची डिलिव्हरी Swiggy Delivery करतानाच तीन तरुणांनी लुटमारीचा गोरख धंदा सुरू केल्याचा प्रकार हडपसर पोलिसांनी Hadapsar Police उघडकीस आणला आहे. या तिघांनी दोन गुन्हे केल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी तब्बल 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज CCTV Footage तपासत आरोपींचा माग काढला आहे. आकाश सिद्धलिंग जाधव (वय 23), विजय जगन्नाथ पोसा (वय 22) आणि साहिल अनिल गायकवाड (वय 22) अशी अटक Arrested करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. Pune Crime News Three arrested in robbery case while delivery zomato and swiggy

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हडपसर भागातील 60 वर्षीय भारती विठ्ठल भाडळे या पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या जवळ येत गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा Crime दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस करत होते.
त्यांनी हा गुन्हा घडलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यात तिघांनी या महिलेचा पाठलाग करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
तर त्यांच्या गाडीवर झोमॅटो डिलिव्हरीची बॅग लावलेली असल्याचे दिसून आले.
त्यानंतर हडपसर पोलिसांनी या परिसरातील 500 हुन अधिक सीसीटीव्ही तपासले.
त्यात ही दुचाकी खराडीपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर शेवाळवाडी परिसरात सापळा रचून या तिघांना पकडले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

त्याचवेळी त्यांच्याकडून झोमॅटोची डिलिव्हरी देण्यासाठी निर्मल टाऊनशिप सोसायटीमध्ये गेल्यानंतर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेलयाचाही गुन्हा उघडकीस आला आहे.
या गुन्ह्याने त्यांचे आत्मबळ वाढले असल्याचे समोर आले आहे.
उपनिरीक्षक सौरभ माने अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,
सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम,
पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे, सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड,
उपनिरीक्षक सौरभ माने, कर्मचारी प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर,
अविनाश गोसावी, समीर पांडुळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Titel : Pune Crime News Three arrested in robbery case while delivery zomato and swiggy

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना