Pune Crime News | मंडईतील रामेश्वर चौकातील गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना अटक; अक्षय वल्लाळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी करायची होती ‘गेम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वैमनस्यातून मंडईतील रामेश्वर चौकात (Rameshwar Chouk, Mandai Pune) तरूणावर गोळीबार (Firing In Pune) करून फरार झालेल्या मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) अटक केली आहे. काही महिन्यांपुर्वी नाना पेठेत अक्षय वल्लाळ (Akshay Vallal Murder Case) याचा खून झाला होता. त्याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी रामेश्वर चौकात दुचाकीस्वार तरूणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी शेखर अशोक शिंदे Shekhar Ashok Shinde (32) हा तरूण जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी रूपेश राजेंद्र जाधव Rupesh Rajendra Jadhav (24, रा. कुंभारवाडा, नाना पेठ), प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ येमूल Prathamesh Alias Ganesh Gopal Yemul (22, रा. नाना पेठ) आणि बाळकृष्ण विष्णु गाजुल Balkrishna Vishnu Gajul (24, रा. नाना पेठ – Nana Peth) यांना अटक केली आहे. दोनच दिवसांपुर्वी आरोपींनी शेखरला मंडईच्या रामेश्वर चौकात अडवून त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले आणि पिस्तुलातून गोळीबार केला होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिस आरोपींच्या मागावर होते. (Pune Crime News)
आरोपी रूपेश जाधव आणि त्याचा साथीदार प्रथमेश हा कोंढवा (Kondhwa) परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली तर बाळकृष्ण गाजुल याला मार्केटयार्ड (Marketyard Pune) परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी अक्षय वल्लाळ याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी शेखरवर खुनी हल्ला केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अक्षय वल्लाळ याचा किशोर शिंदे (Kishor Shinde) आणि त्याच्या साथीदारांनी नाना पेठेत खून (Murder In Nana Peth) केला होता. अक्षय वल्लाळचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुलने कट रचून किशोरचा भाऊ शेखर शिंदे याच्यावर खुनी हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सदरील कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge), अमोल झेंडे (Amol Zende),
सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप भोसले (PI Sandeep Bhosale),
सहाय्यक निरीक्षक अशिष कवठेकर (API Ashish Kavtekar), उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
पोलिस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर,
दत्ता सोनावणे, विठ्ठल साळुंखे, महेश बामगुडे, निलेश साबळे, राहुल मखरे,
अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई आणि तुषार माळवदकर यांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime News | Three arrested including main accused in Rameshwar Chowk firing case in Mandai; ‘Game’ was to be made to avenge the murder of Akshay Vallal
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांनी शिक्षणमंत्री केसरकर घायाळ; असं काय घडलं नेमकं?