Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : पत्रकारांना मॅनेज करावे लागेल ! पोलिस व पत्रकारांची भिती घालुन 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मानव विकास परिषदेचा प्रदेशाध्यक्ष संदिप कुटेविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्रकारांना मॅनेज करावे लागेल (For Managing Journalists) , पोलिस (Police) व पत्रकारांची (Reporters) भिती घालुन तसेच सुसाईड नोट (Suicide Note) असलेल्या डायरीचा वापर करून 10 लाख रूपयाच्या खंडणीची मागणी (Extortion Cases) केल्याप्रकरणी मानव विकास परिषदेचा (Manav Vikas Parishad) प्रदेश अध्यक्ष संदिप सुदाम कुटे Sandeep Sudam Kute (रा. रांजणगाव – Ranjangaon, ता. शिरूर – Shirur, जि. पुणे) याच्याविरूध्द शिरूर पोलिस स्टेशनमध्ये (Shirur Police Station) खंडणीची (Ransom) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

यासंदर्भात कालुराम दशरथ मलगुंडे (39, रा. मु.पो. ढोक सांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सदरील गुन्हा हा शिरूर रामलिंग हद्दीत, रांजणगाव येथील हॉटेल संदीप (Hotel Sandeep Ranjangaon) आणि कारेगाव शिंदोडे गावच्या हद्दीत वेळावेळी दि. 8 मे 2023 ते दि. 10 मे 2023 दरम्यान वेळावेळी घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 8 मे 2023 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील रामलिंग रोडवर फिर्यादी कालुराम मलगुंडे यांचा पुतण्या योगेश मलगुंडे यांच्या मैत्रीणीने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या (Suicide In Pune) केली होती. आरोपी संदीप सुदाम कुटे हा सदर ठिकाणी मदतीसाठी गेला होता. त्याने मयत महिलेने लिहिलेली सुसाईड नोट असलेली डायरी ही महत्वाचा पुरावा असताना देखील ती नष्ट करण्याच्या हेतूने गुपचुप स्वतःकडे ठेवली. सदरील डायरी पोलिसांना दिली असल्याची खोटी माहिती फिर्यादीला दिली. पोलिसांचे चोरून काढलेले फोटो त्याने फिर्यादीला पाठविले. तसेच पत्रकारांना मॅनेज करावे लागेल अशी भिती दाखवुन फिर्यादीला शिंदोडी येथे पत्रकाराकडे नेले. मात्र, संदीप कुटेने शिंदोडी गावाच्या अलिकडेच फिर्यादीला गाडीतून खाली उतरवले आणि पत्रकारांना भेटण्यासाठी तो गेला. तो पत्रकारांना भेटुन आला.

पोलिसांची व पत्रकारांची भिती घालुन तसेच सुसाईड नोट असलेल्या डायरीचा वापर करून त्याने सदरील डायरीमध्ये
तुमच्या पुतण्या योगेश मलगुंडेचे नाव आहे असे सांगुन वेदांता हॉस्पीटलचे बील भरायचे आहे असे म्हणुन
फिर्यादीकडून 30 हजार रूपये ऑनलाइन ट्रान्सफर (Online Transfer) करून घेतले.
त्यानंतर संदीप कुटेने वेळावेळी फिर्यादीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल (Whatsapp CAll) करून योगेशला वाचवायचे असेल
तर माझ्याकडे तात्काळ 10 लाख रूपये जमा करा असा तगादा लावला (Blackmail). आरोपी संदीप कुटेने वेळावेळी
10 लाखाची मागणी केल्याने फिर्यादी कालुराम मलगुंडे यांनी शिरूर पोलिस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली.

शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत (PI Sureshkumar Raut) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा अधिक
तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव (API Yadhav) करीत आहेत.

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion MLA bacchu kadu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले – ‘आता विस्तार झाला नाही तर मग…’

Param Bir Singh Suspension Orders Revoked | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबन देखील रद्द

Devendra Fadnavis | ‘भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा (व्हिडिओ)