Pune : विरोधातील व्हिडीओ WhatsApp वर टाकल्यानं सराईतानं मुलाचा मोडला हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधात असलेला व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकल्याच्या रागातून सराईताने मुलाला मारहाण करत त्याचा हात मोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपुर्वी सकाळी अकराच्या सुमारास कसबा पेठेत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रमेश उर्फ गोट्या रायप्पा कोळी (वय २९) व प्रशांत यलप्पा कोळी (वय २३, दोघेही रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जाकिर इमाम भोलवाले (वय ४७, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाकिर आणि रमेश उर्फ गोट्या कसबा पेठेत राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी जाकिरने मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपपवर रमेशच्या विरोधातील व्हिडिओ व्हायरल केला. त्याचा राग आल्यामुळे रमेशने जाकिरचा पाठलाग करुन लाकडाच्या फळीने त्याला मारहाण करुन हात मोडला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी लागलीच दोघांना अटक केली. अधिक तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.