Pune : व्यापार्‍याला बोलण्यात गुंतवणूक रोकड लांबवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात व्यावसायिक व दुकानदारांना बोलण्यात गुंतवून गल्यातील रोकड पळविणाऱ्या टोळीने शहरात धुडगूस घातला असून, पुन्हा एका स्टेशनरी दुकानातील कामगारांना बोलण्यात गुंतवून गल्यातील 12 हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रवीण चौधरी (वय 27, फुलेनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर भागात व्हीनस स्टेशनरी व गिफ्ट मर्चंट या नावाने दुकान आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात तीन व्यक्ती ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी बाहेर ठेवलेले प्लॅस्टिक बकेट घ्यायच्या असून, त्या दाखवण्यास सांगितले. तसेच कामागरास दुकानाच्या बाहेर बोलावले. त्यानंतर दोघांनी कामागरास बोलवण्यात गुंतवले. तर ऐकाने गल्यातील 12 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ते गेल्यानंतर त्यांनी गल्यातील रोकड पहिली असता त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला आहे.

दरम्यान शहरात या घटना वाढीस लागल्या असून, व्यावसायिक व दुकानदारांना त्यांच्याकडे खरेदीच्या बहाण्याने येऊन रोकड पळवत जात आहेत. ही टोळी सध्या शहरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like