Pune News : लोहगाव परिसरात पुर्ववैमनस्यातून टेम्पो चालकावर कोयत्याने वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लोहगाव भागात पूर्ववैमनस्यातून टेम्पोचालकास अडवत त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली.

याघटनेत प्रितम जाधव (वय 24, रा.लोहगाव) जखमी झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे शनिवारी सकाळी त्यांच्या टेम्पोमध्ये माल भरुन लोहगावमधुन भुकुम वस्तीकडे जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने जाधव यांचा टेम्पो अडविला. त्यानंतर त्यांना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केला. “तुला आता संपवुन टाकतो, तुझी सुपारी दिली होती, तु कसा वाचलास” अशी धमकी देत आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर वार केले. या घटनेनंतर फिर्यादी तेथून पळून जात होते, त्यावेळी आरोपीने त्यांचा पाठलाग करुन फिर्यादीच्या कमरेवर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुकक्यानी जबर मारहाण केली. अधिक तपास सहायक निरीक्षक आर.ए.पाटील करीत आहेत.