Pune News : पनवेलमधील तरूणाचा पुण्यातील तरूणीला लग्नासाठी हट्ट, ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिला त्रास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ओळख झालेल्या पनवेलमधील तरुणाने पुण्यातील तरुणीला लग्न करण्याचा हट्ट धरत लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन भयावह त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तरुणीला फोटो व्हायरल करेल असे म्हणत घरच्यांना त्रास देण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी पुण्यातील 21 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पनवेल येथील अक्षय निगडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तिची आणि आरोपीची डिसेंबर 2019 मध्ये व्हाट्सअ‍ॅपच्या ओळख झाली होती. पण तरुणीने त्याला बोलण्यास टाळाटाळ सुरू केली. यावेळी त्याने तरुणाला सतत फोन करून तू जर माझ्याशी बोलली नाही, तर आपले फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. तसेच तुझ्या घरच्यांना त्रास देईल. माझ्यासोबत लग्न न केल्यास माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल, असे म्हणून सतत तिला फोन करत तिला त्रास दिला. सततच्या त्रासाला कंटाळून तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सिहगड रोड पोलीस करत आहेत.