Pune : ‘हम इधर के भाई है’ असे म्हणत लोखंडी रॉडने तरुणाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- गाडीचा धक्का लागल्यानंतर दोघांनी एका तरुणाला ‘हम इधर के भाई है’ असे म्हणत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. लष्कर परिसरातील कुरेशी मज्जिद जवळ बुधवारी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी आफ्ताब उर्फ अफी शेख व आफताब याचा मित्र समीर या दोघावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनी प्रकाश कुराडे (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखतात. दरम्यान फिर्यादी यांचे गाडीचा धक्का आरोपीला लागला होता. यावरून आरोपीनी त्यांना शिवीगाळ करत गाडीची काच फोडली. तसेच गोंधळ घातला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा भाऊ, हे परत जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केले. तसेच ‘हम इधर के भाई है’ असे म्हणत हातातील हत्यारे दुकानदार व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दाखवत दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद केली व रस्त्याने जाणारे लोक देखील पळून गेले.