माहिती पुरवत असल्याच्या रागातून बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  माहिती पुरवत असल्याच्या रागातून तरूणाला लोखंडी रॉडने व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. समर्थ पोलिसांनी तिघांना अटक केली.

कुणाल सोमनाथ रावळ (26), मयुर दत्तात्रय थोरात (21) आणि कुणाल वसंत झेंडे (18, तिघेही रा. नानापेठ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत सुमित घाटा (18, रा. गणेशपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार नाना पेठेतील घोडेपीर दर्ग्यासमोरील रोडच्या पलीकडे असलेल्या बोळात घडला. सुमित हा एका व्यक्तीला माहिती देत असल्याच्या रागातून आरोपींनी हा हल्ला केला.