Pune : जोडपे झोपले होते हॉलमध्ये, चोरटयाने बेडरूम मध्ये घुसून काम केले तमाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   चोरटयांनी पुणेकरांना आणखी एक चुणूक दाखवुन दिली असून, हॉलमध्ये दाम्पत्य झोपल्यानंतर बेडरूममध्ये घुसून 3 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. विमानतळ परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोहगाव येथे माळवाडी वस्तीत प्राईम रिजेन्स रो हाऊस येथे राहतात. दरम्यान ते 4 मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे हॉलमध्ये पत्नीसह झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरटे बेडरूममध्ये उघड्या खिडकीवाटे आत शिरले. तसेच कपाटातून रोकड आणि दागिने असा 3 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी उठल्यावर फिर्यादी याना चोरी झाली असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.