Pune : खराडी-हडपसर रस्त्यावर अल्पवयीन मुलाकडून दुचाकीस्वारास मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खराडी हडपसर रस्त्यावर अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारांनी एका दुचाकीस्वाराला अडवून लोखंडी वस्तूने मारहाण करत लुटल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी बिभीषण सिरसट (वय 26) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कुणाल यल्लप्पा जाधव (वय 20) याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर एकजण पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे साडेसतरा नळी परिसरात राहतात. दरम्यान ते रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर खराडी हडपसर रोडने घरी जात होते. यावेळी खराडी पुलावर आल्यानंतर या तिघांनी त्यांची दुचाकी आडवी घालत त्यांना अडविले. तसेच, त्यांना मारहाण करत एकाने लोखंडी वस्तूने मारहाण करत पँटच्या खिशातील 9 हजार 700 रुपये जबरदस्तीने काढून नेले. यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.