Pune : रॉडने तरूणाचे 2 दात पाडले, एकजण अटकेत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जुन्या वादातून तरुणाचे रॉडने मारहाण करीत दोन दात पाडल्याचा प्रकार खडक भागात घडला. खडक पोलिसांनी लागलीच एकाला अटक केली.

याप्रकरणी आकाश प्रकाश भोसले (वय २२ रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली आहे. जफर कुरेशी (वय २७, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा नउच्या सुमारास कुरेशी त्यांच्या मित्राबरोबर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आकाशने कुरेशी यांच्या तोंडावर रॉडने मारहाण केली. गंभीर मारहाणीत कुरेशी यांचे दोन दात पडले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच भोसले याला पकडले.याप्रकरणी उपनिरीक्षक एस.एस. पांढरे हे तपास करत आहे.