पुण्याच्या मध्यवस्तीत लुटमारीच्या 3 वेगवेगळया घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात लूटमार करणाऱ्या गुन्हेगारानी चांगलीच दहशत निर्माण केली असून, काही तासांत मध्यवस्तीत वेगवेगळ्या तीन घटनांत गुन्हेगारांनी जबरदस्तीने लुटले आहे. भरदिवसा या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. लष्कर आणि फरासखाना परिसरात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात 31 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी औन्ध भागात राहण्यास आहे. दरम्यान त्या सोमवारी कामानिमित्त एम.जे. रोडवर आल्या होत्या. त्यावेळी त्या पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली. त्यांनी आरडा ओरडा केला. परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.

त्यानंतर दुसरी घटना भरवर्दळीच्या वेळीच सुनील कांबळे यांच्या ऑफिस समोरील सार्वजनिक रोडवर घडली आहे. चारचाकीमधून दाम्पत्य जात होते. त्यावेळी एक रिक्षा त्यांच्या गाडीजवळ आला. त्याने मॅडम तुमचा पदर दरवाज्यात अडकला असल्याचे सांगितले. त्यामुळे पतीने गाडी हळू घेतली. तर महिलेने दरवाजा उघडून पदर आत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी रिक्षा चालक व त्याच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्यांने महिलेच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली. कार थांबवत रिक्षा चालकाचा पाठलाग केला. तसेच आरडाओरडा केला. मात्र तो रिक्षा चालक पसार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या 49 वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच तिसरी घटना शिवाजी रोडवर दुपारी घडली आहे. याबाबत 28 वर्षीय तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुण हा पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी रोडवरील रॉयल डिजिटल या दुकानासमोर गाडी पार्क करून थांबले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एकाने त्यांना लाथ मारली. तर खाली पडून हात घट्ट धरले. तर दुसऱ्या चोरट्याने खिशातील 25 हजार रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like