Pune : चाकूच्या धाकाने रिक्षाचालकाला लुटले, तिघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   रिक्षाचालकाला अडवून तिघांनी चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना हडपसर परिसरात घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून हा प्रकार दोन दिवसांपुर्वी रात्री हडपसर ब्रीजखाली असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ घडला आहे.

बाबासाहेब वसंत कदम (वय ३०), विनीत रामचंद्र वाकडे (वय २४, रा. जुना मुंढवा पूल), संतोष शंकर गुंजाळ (वय २४, रा. शेवाळवाडी ) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी रिक्षाचालक कैलास शिरसाट (वय ३२, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक वैâलास घरी चालले होते. त्यावेळी ते गांधी चौकातील सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेले. त्याठिकाणी आलेल्या बाबासाहेब, विनीत आणि संतोषने वैâलासला चावूâचा धाक दाखविला. त्यांच्याकडीत मोबाईल आणि ७०० रुपयांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. उपनिरीक्षक एस. एस. पांढरे तपास करीत आहेत.