पुण्यातील शिवाजीनगर आणि मार्केटयार्ड परिसरातील फ्लॅट चोरट्यांनी फोडले

पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून शिवाजीनगर व मार्केटयार्ड परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले आहेत. चार फ्लॅट फोडल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसत आहे. शिवाजीनगर येथे 3 आणि मार्केटयार्ड येथे 1 फ्लॅट फोडला आहे. दरम्यान काही केल्या शहरात सुरू असणारे हे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या मीरामार हाउसिंग न्यू इरा हौसिंग सोसायटीत राहण्यास आहेत. फिर्यादी या महिला कामाच्या निमित्ताने फ्लॅट बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच बेडरुमधील कपाटात ठेवलेली रोकड, विदेशी चलन, सोन्याचे दागिने असा 1 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून नेला. त्या परत आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.

शिवाजीनगर येथील अजित अपार्टमेंटमधील 3 फ्लॅट फोडून चोरट्टांनी चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आली. याप्रकरणी महेंद्र शहा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजित अपार्टमेंट मधील ए बिल्डिंगमध्ये महेंद्र शहा, मकरंद देव आणि माधुरी भट यांचे फ्लॅट आहेत. हे फ्लॅट बंद असताना चोरट्याने फ्लॅटचे कुलप कशाच्या तरी साह्याने तोडून आत प्रवेश केला. फ्लॅटमध्ये घरफोडीचा प्रयत्न केला. घरात काहीही न सापडल्यामुळे सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.