रूग्णालयात येणार्‍या ऑक्सिनच्या सिलेंडरचा त्रास, एकाकडून चालकास शिवीगाळ अन् रूग्णालयाची फोडली काच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रुग्णालयात येणाऱ्या ऑक्सिजनच्या गॅस टाक्यांचा आवाजाने त्रास होत असल्यावरून एकाने चालकास शिवीगाळ करत रुग्णालयावर दगड मारून काचा फोडल्याची घटना घडली. पोलिसांनी एकाला अटक केली. हे रुग्णालय पालिकेने कोरोना रुग्णावर उपचार करण्यास मान्यता (अधिग्रहण करणे) दिली आहे. गणेश ज्ञानेश्वर गाडे (वय 37, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी विनोद भारती (वय 40) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खराडी भागात रायझिंग मेडीकेअर हॉस्पिटल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हे रुग्णालय कोरोना उपचार रूग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलींडर लागतात. दरम्यान दोन दिवसांपूर्वी हे सिलेंडर टाक्या गाडीतून उतरविण्यात येत होत्या. यावेळी सिलींडरच्या टाकीचा आवाज होत होता.

या आवाजामुळे त्रास होत असल्याने गाडे हा रूग्णालयाच्या आवारात आला. त्यांनी ऑक्सिजन सिलींडर वाहतूक करणारा गाडीचालक अशोक खेडेकर व सुरक्षारक्षक स्वप्नील शर्मा यांना धमकावले. सिलींडर उतरविण्यास त्यांनी मज्जाव केला. तसेच गाडेने रूग्णालयाच्या आवारात गोंधळ घालून रूग्णालयाच्या इमारतीवर दगडफेक केली. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच रूग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केल्याप्रकरणी गाडे याला अटक करण्यात आली. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.