Pune : चिडवल्यावरून दोन तरुणाला बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चिडवल्यावरून दोन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मुंढवा परिसरात घडला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष सुरेश साळुंखे (वय 19), प्रणय हर्षल जाधव (वय 19) आणि अभिषेक मुन्नालाल कसोटे (वय 20, रा. सर्व. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत विक्रम ढोले (वय 30) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा भाऊ असे पायी चालत जात असताना आरोपींनी त्यांना चिडवले होते. याबाबत फिर्यादी याने त्यांना विचारणा केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. बुधवारी रात्री फिर्यादी जात असताना तिघांनी अडवून त्याला बेदम मारहाण केली. तसेच कोयत्याने वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.