Pune : 7 वर्षाच्या चिमुकलीला वडिलांकडून बेदम मारहाण, बापाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अभ्यास करत नसल्यावरून 7 वर्षांच्या चिमुकलीला वडिलांनी लाटण्याने व पोळपाटण्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताडीवला रोड परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.

याप्रकरणी नागेश महादेव जाधव (वय 36) असे अटक केलेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेजारी राहणाऱ्या तरुणाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश जाधव हा मिळेल ते कामे करतो. त्याला 7 वर्षांची मुलगी आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्याने रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास मुलीला अभ्यास का करत नाही, असे म्हणत बेलण्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ इतका वाढला की मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आणि नागेश याच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी पाजारी लोक बाहेर आले. त्यावेळी नागेश हा मुलीला पोळपाट आणि बेलण्याने बेदम मारहाण करत होता. शेजारी राहणाऱ्यांनी मुलीला बापाच्या तावडीतून सोडवले. तरीही तो अभ्यासच का करत नाही म्हणून तिला हाताने मारहाण करत होता. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागेश याला पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारी यांनी दिली.