पुण्यात क्रिकेट खेळताना तिघांकडून एकाला रॉडने मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचे वाद सुरु असताना एका तरुणाने मध्यस्ती केल्यानंतर तिघांनी त्या तरुणाला रॉडने मारहाण केली. या मारहाणीत त्याचे दोन दात पडले आहेत. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वडारवाडीतील मैदानावर ही घटना घडली आहे.

याप्रकरणी सागर धोत्रे (वय ३३, रा. वडारवाडी ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर आणि त्यांचा मित्र राहूल डोंगरे वडारवाडी परिसरातील मैदानावर बसले होते. त्यावेळी तेथे क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मुलांसोबत तिघेजण वाद घालीत होते. त्यावेळी सागरने मध्यस्ती करुन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे तिघांनी सागरला आणि राहूला रॉडने मारहाण केली. अधिक तपास चतुःशृंगी पोलिस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like