Pune Crime News | बसस्टॉपवर मैत्रिणीचा घेतला कीस; लग्न केले नाही तर जीव देण्याची दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मैत्रीचे संबंध असताना बसस्टॉपजवळ अल्पवयीन मुलीशी लगट करुन तिचे भर रस्त्यात चुंबन घेतले. त्याला तिने विरोध केल्याने माझ्याशी लग्न कर नाही तर जीव देईन, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत कात्रज येथील एका १७ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम गंगाधर शेडगे (वय २२, रा. नायगाव) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारी पासून शनिवारपर्यंत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा फिर्यादी यांच्या ओळखीचा असून त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. फिर्यादी या कात्रज बसस्टॉपजवळ असताना शुभम तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याशी शारीरीक लगट करुन त्यांना कीस करुन लज्जास्पद वर्तन केले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केल्यावर त्याने “माझ्याशी लग्न कर नाही तर मी जीव देईल आणि तुझे पण नीट नाही होऊ देणार” असे म्हणून फिर्यादीचा घरापर्यंत पाठलाग केला. तिच्या वडिलांना शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक तावडे तपास करीत आहेत.

 

Web Title :  Took a friend’s case at the bus stop; Threatened to kill if not married

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा