Pune Crime News | काशेवाडीत मेफेड्रोनची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | काशेवाडी (Kashewadi) परिसरात मेफेड्रोन (Mephedrone) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या (Anti-Narcotic Cell Pune) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख रूपये किंमतीचे 10 ग्रॅम मेफेड्रान आणि 10 हजार रूपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. (Pune Crime News)

अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी हे खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस नाईक साहिल शेख आणि पोलिस अंमलदार अझीम शेख यांना कानिफनाथ विष्णू नायडू हा व्यक्ती कोणतेतरी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी काशेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कायदेशीर बाबी पुर्ण करून पोलिसांनी परिसरात सापळा रचला. नायडूला संशयावरून ताब्यात घेतले आणि त्यांची अंगझडती घेतली. त्याच्याकडे 2 लाख रूपये किंमतीचे 10 ग्रॅम मेफेड्रान हे अंमली पदार्थ आढळून आले. त्याला अटक करून अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले. त्याच्याविरूध्द खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte), पोलिस उपनिरीक्षक डी.एल. चव्हाण (PSI DL Chavan), पोलिस हवालदार संतोष देशपांडे, पोलिस नाईक शेळके, साहिल शेख, पोलिस अंमलदार अझीम शेख, नितीन जगदाळे आणि युवराज कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :-   Pune Crime News | Trafficker arrested for selling mephedrone in Kashewadi Pune Police Crime Branch Anti-Narcotic Cell Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा