Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून करणार्‍या तिघांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) करून खून करून तिचा मृतदेह बॅगेत (Dead Body In Bag) भरून तळेगाव रेल्वे स्टेशन (Talegaon Dabhade Railway Station) येथे टाकणार्‍या तिघांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप (Double Life Imprisonment) आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश जे.जी.डोरले (Special Judge J.G. Dorley) यांनी सुनावली. बलात्कार (Rape), खूनसह (Murder), फुस लावून पळवून नेणे, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलमाने शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. (Pune Crime News)

 

राहुल रविंद्र बरई (Rahul Ravindra Barai), जिशान ऊर्फ इशान हमझा अली कुरेशी (Zishan aka Ishan Hamzha Ali Qureshi), संतोष विष्णू जुगदर (Santosh Vishnu Jugdar) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. वडाळा येथे राहणार्‍या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील लीना पाठक (Adv Leena Pathak) यांनी २८ साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आरोपी ज्या गाडीतून गेले. त्या गाडीच्या चालकाची साक्ष महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वामन कोळी यांनी शिक्षेवर युक्तीवाद केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके (Police Inspector Ramdas Shelke) यांनी केला. (Pune Crime News)

पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णू साळेकर (PSI Vishnu Salekar), हवालदार दत्तात्रय मोरे आणि नाईक निशांत कसबे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. जुगदर याने त्या मुलीला फुस लावून नालासोपारा (Nallasopara) येथील एका इमारतीमध्ये नेले. तिथे कुरेशी आणि बरई राहत होते. तिघांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांकडे करेल आणि आरोपींनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याची माहिती तिला झाल्याने तिचा खून करण्याचा कट रचला.
जुगदर याने तिला मारण्यासाठी बरई आणि कुरेशी यांना ७५ हजार रुपये दिले.
६ मे २०१४ रोजी हाताने आणि ओढणीने गळा आवळून तिचा खून केला.
तिचे हात बांधून मृतदेह बॅगेत भरण्यात आला. कॅबमधून ती बॅग दादर येथे नेण्यात आली.
तेथून स्कॉर्पिओ गाडीतून पुणे रेल्वे स्टेशनजवळील (Pune Railway Station) एस.टी.स्टॅण्ड (Pune Station ST Stand) येथे नेली.
तेथून रिक्षाने नेवून तळेगाव येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन येथे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ती बॅग टाकून देण्यात आली होती.

 

Web Title :  Pune Crime News | Triple life imprisonment till death for gang rape and murder of minor girl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा