Pune Crime News | अपघातानंतर पसार झालेला ट्रकचालक गजाआड; २५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध

पुणे : Pune Crime News | महापालिका भवन (Pune PMC) परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून पसार झालेल्या ट्रकचालकाला पकडले. (Pune Crime News)

ख्वाजामिया मस्तानमिया खान (वय २६, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महानगरपालिका भवन परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार पृथ्वीराज विष्णुकुमार शेळके (वय २२, रा. पिंपरी) याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांना ट्रकचा वाहन क्रमांक मिळाला नव्हता. अंमलदार रणजित फडतरे यांनी महापालिका भवन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा अपघातानंतर ट्रकचालक गाडगीळ पुतळा परिसरातून कुंभारवेस चौकातून मालधक्का परिसरात गेल्याचे आढळून आले. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेव्हा ट्रकचालक हैद्राबादला गेल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)

दरम्यान, हैद्राबादहून ट्रकचालक निघाला असून तो मालधक्का परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ट्रकचालक खान याला मालधक्का परिसरात ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अपघाताची कबुली दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivajinagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior PI Arvind Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे (Assistant Inspector Bholenath Ahivale), अविनाश भिवरे, रणजीत फडतरे, बशीर सय्यद, गणपत वाळकोळी आदींनी ही कारवाई केली.

Web Title :- Pune Crime News | Truck driver escaped after accident; The discovery was made after checking 250 CCTVs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Aaron Finch | ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा