
Pune Crime News | माझ्याकडे बघुन थुंकला का म्हणत तरुणाच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | माझ्याकडे बघून थुंकला आता तुझा जीवच घेतो, असे बोलून कोयत्याने (Koyata) वार करुन तसेच ब्लडने गळ्यावर वार करुन गुंडाने तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)
या घटनेत धीरज उत्तम पाटोळे (वय २०, रा. सात चाळ, गणेशनगर, एरंडवणे) हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी नरेंद्र महादेव बलकवडे Narendra Mahadev Balakwade (वय ३०, रा. सात चाळ, एरंडवणे) याला अटक केली आहे. बलकवडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) आहे. ही घटना गणेशनगरमधील मंडळाच्या मंडपात शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा वस्तीतील मंडळाच्या स्टेजवर बसला होता. त्यावेळी बलकवडे तेथे आला. फिर्यादी यांना खाली उतर असे बोलून त्यांची गचेंडी पकडून स्टेजवरुन खाली घेतले. परवाच्या दिवशी माझ्याकडे बघून थुंकला आता तुझा जीवच घेतो, असे बोलून त्याने कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी तो चुकविल्यावर त्याने फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून मी इथला भाई आहे, तु मला ढकलतोस असे बोलून खिशातील ब्लेड काढून फिर्यादीचे गळ्यावर वार करुन दुखापत केली. फिर्यादीच्या मदतीला येणार्या लोकांना धमकावुन दहशत निर्माण केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन बलकवडे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सतपाळे (PSI Satpale) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
01 October Rashifal : महिन्याचा पहिला दिवस या ५ राशींसाठी शुभ, धनलाभाची संधी, वाचा दैनिक भविष्य
PSI Ramrao Patil Death In Accident | दुर्देवी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा (PSI)
उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Sachin Waze | खंडणी प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर