Pune Crime News | ‘तुझे देख के मुझे मेरे मरी हुई बीवी की याद आ गई’ ! 50 वर्षाच्या नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे : Pune Crime News | शेजारी राहणाऱ्या एका १२ वर्षाच्या मुलीला तुझ्याकडे पाहून मृत्यु पावलेल्या पत्नीची आठवण होते, असे सांगून एका ५० वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundagarden Police) ५० वर्षाच्या नराधमाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२३ मध्ये ताडीवाला रोड येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेका शेजारी रहातात.
फिर्यादी यांची १२ वर्षाची मुलगी झोपली असताना आरोपी तिच्याजवळ गेला. तिच्याशी अश्लिल चाळे केले.
ती ओरडली असता तिला शांत करुन तिला २० रुपये दिले. ‘‘तुझे देख के मुझे मेरे मरी हुई बीवी की याद आ गई, लेकिन इसके बारे मे किसी को बताना मत,’’ असे म्हणाला. ही बाब या मुलीने आता आईला सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सपकाळ तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | ‘Tujhe dekh ke muje mere mari hui biwi ki yaad aa gayi’ ! Minor girl molested by 50-year-old murderer
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Nashik Crime News | नाशिकमध्ये तोल जाऊन गिर्यारोहकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू