Pune Crime News | दोघा अकाऊंटंटकडून रांका ज्वेलर्सची 1 कोटी 6 लाखांची फसवणूक, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील सुप्रसिद्ध ज्वेलर्स रांका (Ranka Jewellers) यांच्या दुकानातील अकाऊंटची जबाबदारी पाहणार्‍या दोघांनी बनावट सह्या (Forged Signatures) करुन अनोळखी व्यक्तींच्या नावावर धनादेश काढून त्याद्वारे तब्बल १ कोटी ६ लाख ३५ हजार ७२५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

 

अमन ओझा (Accountant Aman Ojha) आणि देव नारायण दुबे (Accountant Dev Narayan Dube) अशी या दोघा अकाऊंटंटची नावे आहेत. याप्रकरणी राज दिंगबर देशपांडे (Raj Digamber Deshpande) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३/२३) दिली आहे. हा प्रकार रांका ज्वेलर्सच्या यांच्या रविवार पेठ शाखेत (Ranka Jewellers Raviwar Peth) १०सप्टेबर २०२० ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज देशपांडे हे रांका ज्वेलर्समध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे अमन ओझा आणि देव नारायण दुबे हे दोघे अकाऊंटंट म्हणून कामाला होते. त्यांच्यावर दुकानातील अकाऊंट पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या दोघांनी दुकानाचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशवर फिर्यादी यांच्या बनावट सह्या करुन अनोळखी व्यक्त्यांच्या नावे इनव्हाईस तयार केले. ते धनादेश अनोळखी व्यक्तींच्या खात्यावर जमा करुन पैसे काढून घेत राहिले. त्यानंतर त्यांच्यातील एकाने मागील सप्टेंबर २२ मध्ये नोकरी सोडून दिली.

 

त्यानंतर दुसर्‍याने फेब्रुवारीमध्ये नोकरी सोडली. त्यानंतर एका धनादेशाबाबत फिर्यादी यांना शंका आली.
त्यावर आपली बनावट सही असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर मागील दोन वर्षांचा हिशोब तपासल्यानंतर या दोघांनी वेळोवेळी बनावट सह्या करुन तब्बल १ कोटी ६ लाख ३५ हजार ७२५ रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) युनिट-1 चे सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर (API Kavthekar) तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime News | Two accountants cheated Ranka Jewelers of Rs 1 crore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑनलाईन जुगार घेणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 7 जणांवर कारवाई

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त