Pune Crime News | ‘मी पारावरचा भाई’ म्हणत तरुणाला लुबाडणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | मोटारसायकलवरुन घरी जात असलेल्या तरुणाला अडवून ‘मी पारावरचा भाई आहे, तुझ्याकडील सर्व पैसे दे,’ असे म्हणून कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) दोघा गुंडांना अटक केली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत वैभव रामचंद्र बोराडे (वय २८, रा. शिवराज अपार्टमेंट, आंबेगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य रोहिदास राजंणे (रा. चरवड वस्ती, वडगाव बुदु्क) आणि गणेश पांडुरंग चोरगे (वय २३, रा. पार वस्ती, वडगाव बुदु्क) यांनी अटक (Arrest) केली आहे. गणेश चोरगे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी रात्री पावणे अकरा वाजता सिंहगड रोडवरुन वडगाव पार येथे मोटारसायकलवरुन घरी जात होते. त्यावेळी दोघांनी मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबविले. त्यांच्यातील एकाने ‘‘मी पारावरचा भाई आहे. मला तुझ्याकडील सर्व पैसे दे,’’ असे म्हणून त्यांच्याकडील कोयत्याचा धाक दाखवला.
‘‘तुझ्याकडील पैसे मला दे नाही तर तुला मारुन टाकील’’ अशी धमकी देऊन त्यांच्या
पँटच्या खिशातील १ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन हाताने मारहाण (Beating) केली होती.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक लोहार तपास करीत आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Two arrested for robbing young man saying ‘I’m Paravarcha Bhai’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा