Pune Crime News | सराईत गुन्हेगार पच्चीस उर्फ फैजान शेखवर फायरिंग करणार्‍या यश ससाणेसह दोघांना अटक; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 नं आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील महंमदवाडी रोडवर एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना (Pune Crime News) महंमदवाडी रोड परिसरात सोमवारी (दि.5) रात्री साडेअकरा वाजता घडली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने Anti Extortion Cell Pune (AEC Pune) दोघांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

सराईत गुन्हेगार पच्चीस उर्फ फैजान रमजान शेख Pacchis alias Faizan Ramazan Shaikh ( वय. 21, रा. सय्यद नगर, कोंढवा – Kondhwa) याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने चेतन बाळू जाधव Chetan Balu Jadhav (वय 21 रा. ससाणे नगर, अमित हाईट्स, हडपसर पुणे) आणि यश सुनिल ससाणे (रा. मोहम्मदवाडी) यांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr. PI Pratap Mankar) यांच्या पथकाने केली आहे.

पच्चीस ऊर्फ फैजान शेख याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत (Criminals On Pune Police Record). खान हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार (Pune Firing News) केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

घटनास्थळी अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर Sr PI Pratap Mankar (खंडणी विरोधी पथक-2 Anti Extortion Cell Pune (AEC Pune), वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Patare), वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम (Sr PI Ulhas Kadam) यांच्यासह इतर अधिकारी व पोलिस अंमलदारांनी भेट दिली होती.

दरम्यान, खंडणी विरोधी पथक-2 चे पोलिस अधिकारी व अंमलदार हे फायरिंग करणार्‍या आरोपींच्या मागावर होते. त्याचवेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना आरोपी हे जुना मोदी खाना कॅम्प परिसरात असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. अखेर पोलिसांनी सापळा रचुन दोघांना अटक केली.

 

Advt.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),

पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलिस
उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), पोलिस
अंमलदार सुधीर इंगळे, पोलिस अंमलदार शंकर संपते, पोलिस प्रदीप शितोळे, पोलिस राहुल उत्तरकर,
पोलिस विनोद साळुंखे, पोलिस सदोबा भोजराव, पोलिस संग्राम शिनगारे, पोलिस
पवन भोसले, पोलिस सुरेंद्र जगदाळे, पोलिस चेतन शिरोळकर, पोलिस सुरेंद्र जगदाळे,
पोलिस सचिन अहिवळे आणि इतर पोलिसांनी केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Two arrested, including Yash Sasane, for firing at criminal Pacchis
alias Faizan Shaikh; The anti-extortion Cell-2 of the Pune Police crime branch has opened its doors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा