Pune Crime News | दोन दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पीएमपीची धडक, एकाची प्रकृती चिंताजनक; गरवारे महाविद्यालय समोरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपी बसची (PMP Bus) धडक दोन दृष्टिहीन विद्यार्थ्यांना (Blind Student) बसली. या अपघातात दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना (Pune Crime News) गरवारे महाविद्यालयासमोर (Garware College) घडली. जखमी विद्यार्थ्यांना एनडीए गेट (NDA Gate) ते पुणे स्टेशन (Pune Station) या बसने धडक दिली. मयुरी गरुडे (Mayuri Garude) आणि वैभव क्षीरसागर (Vaibhav Kshirsagar) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे असून मयुरीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

 

मयुरी गरुडे ही विद्यार्थीनी बीएच्या पहिल्या वर्षात तर वैभव हा एमए च्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
मंगळवारी (दि.31) सकाळी साडेअकरा ते पावणे बाराच्या सुमारास गरवारे महाविद्यालयातून ते दोघे बाहेर पडले.
ते डेक्कन कॉर्नरकडे (Deccan Corner) पायी जात असताना पीएमपीच्या बसने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली.
पीएमपी प्रशासनाकडून मिळालेल्या (Pune Crime News) माहितीनुसार,
बसच्या उजव्या बाजूने एक चारचाकी ओव्हरटेक करत होती.
तर चालकाला हे विद्यार्थी दृष्टिहीन असल्याचे लक्षात आले नाही. ही बस शिवदास काळे (Shivdas Kale) हे चालवत होते.

 

शिवदास काळे यांनी पीएमपी प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, मयुरी आणि वैभव फुटपाथवरुन न चालता रस्त्यावरुन चाल होते. तसेच त्यांच्या हातात स्टिक नसल्याने ते दृष्टिहीन असल्याचे समजले नाही. ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगत दोघांच्या उपचाराचा खर्च पीएमपी प्रशासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime News | two blind students run over by bus in pune both are seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन

Rubina Dilaik | साईड कट गाऊनमध्ये रुबीना दिलैकने दाखवली किलर स्टाईल; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अवतारने चाहते घायाळ

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ

Pune Bypoll Elections | पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी अजित पवारांनी धुडकावली, महाविकास आघाडी निवडणूक लढवणार; अजित पवारांनी केलं स्पष्ट