Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोथरुड परिसरात 89 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. ही धक्कादायक घटना रविवारी कोथरुड येथील मयूर कॉलनीत घडली. मकरंद महादेव मेंगाळे Makarand Mahadev Mengale (वय-89 रा. मयूर कॉलनी, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे. मेंगाळे यांनी एकटेपणातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Pune Crime News)

मकरंद मेंगाळे हे मयूर कॉलनीतील एका इमारतीत एकटेच राहत होते. त्यांना तीन मुले आहेत.
दोन मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आहेत, तर एक मुलगा मुंबईत आहे.
त्यांच्या देखभालीसाठी मुलांनी एक नोकर ठेवला होता. तो त्यांना दोन वेळा जेवण आणून देत होता. (Pune Crime News) मकरंद यांच्या मुलांनी फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मेंगाळे यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार होता. त्यांना चालताही येत नव्हते. ते वॉकर घेऊन चालायचे.

रविवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा नोकर डबा आणण्यासाठी घराबाहेर पडला.
यानंतर मकरंद हे वॉकर घेऊन गॅलरीत आले. गॅलरीतून ते उडी मारण्याचा प्रयत्न करत होते.
त्यावेळी इमारतीच्या समोर थांबलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांना उडी मारु नका, असे सांगितले.
मात्र, मकरंद यांनी गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी त्यांच्या मुंबईतील मुलाशी संपर्क करुन घटनेबाबत कळवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार

तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना